देशातील यंदाच्या दुष्काळी स्थितीला कारणीभूत ठरलेला ’एल निनो’ हा घटक येत्या दोन महिन्यांत त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) दिला आहे. मात्र, त्याचबरोबर येत्या फेब्रुवारीपासून त्याची तीव्रता झपाट्याने कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी हा अंदाज मोठा दिलासा देणारा असून, पुढील वर्षीचा मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. ’सीपीसी’तर्फे दर महिन्याला एल निनोच्या स्थितीचा अहवाल आणि पुढील काळातील स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतो. गेल्या वर्षीपासून प्रथमच प्रशांत महासागराचे तापमान कमी होण्याचा अंदाज अमेरिकेच्या या संस्थेने वर्तवला आहे. जगभरातील सतरा गतिमान प्रारूप (डायनॅमिक मॉडेल) आणि आठ सांख्यिकी प्रारूप (स्टॅटिस्टिकल मॉडेल) यांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवण्यात येतो. एप्रिल 2015मध्ये सीपीसीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनवर सबंध हंगामात ’एल निनो’चे सावट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती खरी ठरून देशाच्या अनेक भागांत अपुरा पाऊस पडला. ’सीपीसी’ने नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार एल निनो हिवाळ्यामध्ये (नोव्हेंबर - डिसेंबर- जानेवारी) त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचण्याची शक्यता असून, मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांहून अधिक नोंदले जाण्याची शक्यता आहे. इतक्या तीव्रतेची एल निनो घटना 1950 पासून फक्त तिसर्यांदाच घडत आहे. मात्र, फेब्रुवारी- मार्चपासून प्रशांत महासागराचे तापमान झपाट्याने कमी होण्याची शक्यता असून पुढील उन्हाळ्यात ते त्याच्या सामान्य पातळीवर (न्यूट्रल) पोचू शकते. एल निनोची न्यूट्रल स्थिती किंवा ला निनाची (सरासरीपेक्षा कमी तापमान) स्थिती असताना भारतात मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता सर्वाधिक असते असे आकडेवारी सांगते. दुष्काळी स्थितीशी सामना करणार्या महाराष्ट्रासाठी हा नक्कीच दिलासादायक अंदाज आहे. यंदाही गारपिटीचा धोका? हिवाळ्यात एल निनोची तीव्रता वाढण्याच्या शक्यतेमुळे पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये राज्यात पुन्हा गारपीटीच्या घटना घडू शकतात, असा इशारा हवामानतज्ञांनी दिला आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ’दोन वर्षांमध्ये ज्या स्थितीत गापिटीच्या घटना घडल्या तशीच स्थिती यंदाही कायम आहे. पश्चिमेकडून येणारे थंड वार्यांचे प्रवाह एल निनोमुळे मध्य भारतातून वाहण्याची शक्यता असून, तसे झाल्यास महाराष्ट्रासह मध्य भारताला पुन्हा गारपिटीचा फटका बसू शकेल. गारपिटीची शक्यता गृहीत धरून शेतकर्यांनी योग्य त्या उपाययोजना करायला सुरुवात करावी.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
आभारी आहोत या महितिबद्दल याची नक्कीच फायदा होईल
ReplyDelete