पुणेकरांना हुडहुडी... थंडी वाढली...

पुणे दिवाळीच्या संगतीने पसरलेल्या गारव्याने शहरात मुक्काम वाढवला असून, शुक्रवारी पारा आणखी घसरला. वेधशाळेत शुक्रवारी १४.१ अंश सेल्सियस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुढच्या दोन दिवसांत थंडीचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असून, आकाश अंशतः ढगाळ राहण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. गेल्या आठवड्यापासून शहरात किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पारा १५ अंशांच्या खाली उतरला होता. शुक्रवारी त्यात आणखी घट झाली. त्यामुळे पहाटेसह सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत हवेत गारठा जाणवत आहे; तसेच, रात्री उशिराची थंडी बोचरी होऊ लागली आहे. पुढील दोन दिवसांत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमान १५ अंशांच्या जवळपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment