मुंबईत शिवसेनेच्या ‘उध्दवगड’ चे 23 नोव्हेंबरला उद्घाटन... ‘राजगड’ पाठोपाठ ‘उध्दवगड’

मुंबई - मनसेच्या राजगड पाठोपाठ आता मुंबईत शिवसेनेचा उद्धवगड साकारत आहे. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रमुख अराफात शेख यांच्या कुर्ला येथील माईलस्टोन बिझनेस सेंटरचे रूपांतर उद्धवगडमध्ये होणार आहे. 23 नोव्हेंबरला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे मध्यवर्ती कार्यालय आणि शेख अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य खाटिक समाजाचे कार्यालय येथे असेल. संघटनेच्या सदस्यांसाठी मध्यवर्ती कॉल सेंटरही उघडण्यात येईल. वाहतूक सेना व खाटिक समाजाच्या वेबसाईटचे उद्घाटनही या वेळी होईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

कॉल सेंटरद्वारे वाहतूक सेनेच्या सदस्यांना राज्यातील कोणत्याही ठिकाणी आणीबाणीच्या प्रसंगी आवश्यक ती मदत केली जाणार आहे. संघटनेने टोईंग सेवेशी करार केला आहे. वाहन कुठेही बंद पडले, अपघात झाला, तर ते वाहन टोईंग सेवेद्वारे त्वरित हटवण्यात येईल. चालकाकडे पैसे नसले तरी वाहनात पेट्रोल-डिझेल भरता येईल. त्यासाठी पेट्रोल-डिझेल पंपमालकांसोबत करार करण्यात आले आहेत. अपघात झाल्यास विम्याची रक्कमही त्वरित मिळवून दिली जाईल. सदस्यांकडून 125 रुपये घेतले जात असून त्या बदल्यात एक लाखाचा विमा उतरवण्यात येत आहे. रिक्षा व टॅक्सीचालकांना खादीचा गणवेश संघटना देणार आहे.
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment