सावंतवाडी - आंबोली येथील विकासासाठी गेल्या पाच वर्षांत आमच्या पक्षाच्या कार्यकारिणीने किती कोटींची कामे केली, याची यादी विरोधकांनीच जाहीर केली आहे. यापूर्वी सातवेळा चौकशी लावूनही काही झाले नाही. यापुढेही कोणत्याही चौकशीस सामोरे जायची तयारी आहे; पण पाचऐवजी गेल्या दहा वर्षांतील कामांची चौकशी करा. आंबोलीची नाहक बदनामी करू नये, असे पत्रक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज प्रसिद्धीस दिले.
आंबोली ग्रामसभेत यापूर्वीच्या कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील कामांची चौकशी करण्याचा ठराव झाला होता. याबाबत परब यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आंबोली ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची पाच वर्षे सत्ता होती. आता आमच्या विरोधकांची सत्ता आलेली आहे. त्यांची पहिली ग्रामसभा तहकूब झाली. तहकूब ग्रामसभा २४ ऑगस्टला पुन्हा झाली. यात मागील पाच वर्षांत झालेल्या कामांच्या विषयांवर चर्चा झाली. आमच्या पाच वर्षांच्या कालावधीत किती कोटींची विकासकामे झाली, त्याची यादीच या सभेत वाचली गेली, त्याबद्दल धन्यवाद. आमची सत्ता असताना अनेक उपोषणे घडवून आणली. निव्वळ विरोधासाठी विरोध म्हणून आंबोली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी निव्वळ सातवेळा उपोषणे झाली. आमची सत्ता असूनही आम्ही चौकशी लावली.
सातवेळा चौकशी करूनहील काही निष्पन्न झालेले नाही. गेल्या पाच वर्षांत सर्व अधिकारी ग्रामपंचायतीस सहकार्य करत होते. त्यांचे आम्ही आभार मानतो.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील पाच वर्षांची चौकशी न करता २००५ ते २०१० पर्यंत पूर्ण चौकशी लावावी. कारण हागणदारीमुक्त गाव २००५ ते २०१० या कालावधीत झालेले आहे. यासाठी सार्वजनिक शौचालये झालेली आहेत. त्या वेळी तत्कालीन सरपंच जगन्नाथ गावडे हे होते. त्यांच्या कार्यकाळाचीही चौकशी करावी. त्या वेळी खोटी यादी का दिली गेली? तसेच गेल्या साडेतीन वर्षांत पंचायत समिती सदस्य सौ. रोहिणी गावडे यांनी गावासाठी किती निधी आणला आणि विकासकामे केली, राज्यासाठी गावाकडून किती निधी आणला हेही जाहीर करावे. नंतरच आपल्याच कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर करून घ्यावा, असे खुले आव्हान कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष शशीकांत गावडे व तालुकाध्यक्ष परब यांनी देऊन या विषयावर केव्हाही आमने-सामनेस तयार असल्याचे म्हटले आहे.

0 comments:
Post a Comment