मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा आढवा घ्या-नगरविकास विभागाचे आदेश

               मुंबई - मुंबई-ठाण्यासह राज्यातील शहरांमधील मोडकळीस आलेल्या इमारतींचा आढावा आतापासूनच घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत. संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून जीर्ण इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे आणि रहिवाशांनी इमारत खाली करण्यास विरोध केल्यास वीज व पाणी तोडावे, असे सरकारने म्हटले आहे.
 

                 राज्यात दरवर्षी पावसाळ्यात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होते. याबाबत विधिमंडळात वारंवार चर्चा होऊन चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर अन्य महापालिका प्रशासनांनी आतापासूनच कार्यवाही करावी, असे नगरविकास विभागाने म्हटले आहे. संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीस योग्य, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करणे अशा प्रवर्गात इमारतींचा समावेश करावा. धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावण्यात यावी. इमारत खाली करण्यास विरोध झाल्यास वीज आणि पाणी तोडण्यात यावे, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment