बॉलीवूडमधील सध्या सर्वात हॉट व एव्हरग्रीन बॅचलर सलमानखान असल्याचा आणखी एक गोड पुरावा नुकताच समोर आला असून नित्या या तीन वर्षाच्या चिमुरडीने सलमानने तिच्याशी लग्न करावे अशी इच्छा व्हिडीओतून व्यक्त केली आहे. हे क्यूट प्रपोजल पाहून सलमानही खूपच खूष झाला आहे कारण सलमानशी लग्नासाठी अनेक सुंदरी लाईनीत असताना ही चिमुरडीही त्यात सामील झाली आहे. हा व्हिडीओ सलमानने ट्विटरवर तसेच फेसबुकवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत नित्याची आई तिला सलमानविषयी प्रश्न विचारताना दिसते आहे. लग्न म्हणजे काय यावर नित्याचे उत्तर आहे ते हॅपी बर्थ डे सारखेच असते. माझा नवरा सलमान आहे असे सांगताना ही चिमुरडी पापाला मी हे सांगितलेले नाही कारण तो लग्नाला नाही म्हणेल असेही कारण देते आहे. नित्या यात सलमानच्या मुन्नी बदनाम हुईवर डान्स करतानाही दिसते आहे.

0 comments:
Post a Comment