जात पंचायतीचा माणुसकीला काळिंबा फसणारा फतवा

jaat-panchayat
नाशिक: आतापर्यंत आपण जातपंचायतींनी वाळीत टाकल्याचे आपण ऐकले आहे, पण आता त्याही पुढे एक पाऊल टाकल्याचे समोर आले आहे. कारण, परभणीच्या गोंधळी समाजाच्या जातपंचायतीने कर्ज फेडा, अन्यथा पत्नीला पाठवा, असा माणुसकीला काळिंबा फसणारा फतवा काढल्याचा दावा नाशिकमधील मोरे कुटुंबियाने केला आहे.
पंचाकडून काही कर्ज मूळ परभणीच्या सेलूतील असणाऱ्या मोरे दाम्पत्याने घेतले होते. त्यांनी त्याच्या व्याजापोटी मोठा परतावाही दिला. मात्र मूळ कर्ज फेडण्यासाठी जातपंचायतीने तगादा लावला. रक्कम परत करता येत नसेल, तर पत्नीला पंचांच्या ताब्यात द्यावी, असा फतवा जातपंचायतीने काढल्याने मोरे कुटुंबीय हादरून गेले. भेदरलेल्या मोरे कुटुंबीयांनी परभणी सोडून थेट नाशिक गाठले. नाशिकमध्ये दोन वर्षापूर्वी दाखल झालेले मोरे दाम्पत्य रोजगार करून गुजराण करतात. मात्र येथेही जात पंचायतीने त्यांची पाठ सोडली नाही. यानंतर मोरे दाम्पत्याने हिम्मत करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. हा सर्व प्रकार ‘अंनिस’ने समोर आणल्याने, जातपंचायतीचा कारनामा जगासमोर उघडा पडला आहे.

jaat-panchayat
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment