डोंबिवली स्थानक सर्वाधिक गर्दी, सर्वाधिक कमाईत अव्वल!

मुंबई: आपली दखल सिनेसृष्टीहीलाही घ्यायला लावणारे डोंबिवली स्थानकाने दररोजची प्रवाशांची गर्दी आणि दररोजच्या उत्पन्नाबाबत अव्वल क्रमांक पटकावला आहे. डोंबिवली स्थानक मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकात अव्वल स्थानी असल्याची ही माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
मुंबईच्या दिशेने नोकरीच्या निमित्ताने कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकांवरुन मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या स्थानकांवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. अशाच वेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या एका माहिती अधिकारातून याबाबतची माहिती समोर आली आहे.
डोंबिवली स्थानक मध्य मुंबई रेल्वेत सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकात अव्वल असून दररोज २,३३,६३५ प्रवासी प्रवास करतात. तर कमाईत सुद्धा डोंबिवली स्थानक असून रु १४,९४,५३८/- उत्पन्न असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दररोज ३८,५५,४१९ प्रवाश्यांचा भार सोसणा-या मध्य आणि हार्बर रेल्वेचे उत्पन्न रु २,१९,१२,८३७/- इतके आहे. गर्दीच्या टॉप ५ मध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाकडे दररोज प्रवास करणारे प्रवासी, एकूण उत्पन्न आणि स्थानक स्तरावर प्रवासी संख्या याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली होती. मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक डॉ आलोक बडकुल यांनी याबाबत माहिती दिली.

dombivili
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment