सीमाभागात मराठी टायगर्सचे प्रदर्शन होणारच – डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘मराठी टायगर्स’मध्ये मांडलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण सीमाभागात प्रदर्शित होणारच असा दावा केला. काहीजण मराठी टायगर्स चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करीत असल्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हे बेळगावात दाखल झाले आहेत.
चित्रपटात काय आहे याची कोणतीही शहनिशा न करता केवळ कपोलकल्पित गोष्टींवर अवलंबून राहून चित्रपटावर बंदी आणायची भाषा केली जात असेल तर खपवून घेतली जाणार नाही. हा चित्रपट सिमा भागातील भावना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे, भावना भडकवण्यासाठी नाही असेही सांगितले.
जेव्हा या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने संमती दिली तेव्हा एक कन्नड भाषेचा एक सेन्सॉरचा मेंबरही तिथे उपस्थित होता. यात काही अपवादात्मक नाही असे त्यांनी सर्टिफिकेट दिले आहे. तरीही बंदीची भाषा बोलली जात असेल तर याला दडपशाहीच म्हणावे लागेल, असेही कोल्हे म्हणाले.

marathi-tigers
Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment